HW Marathi
राजकारण

पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारताविरोधात लेख लिहिण्याचा दावा, शोभा डे यांनी फेटाळला

मुंबई | वादग्रस्त लेखिका शोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारतसरकार विरोधात लेख लिहिण्याचे सांगतले असल्याचा खळबळजण खुलासा पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सांगितले आहे. यानंतर दोघांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दहशतवादी बुऱ्हान वाणीला ठार करण्यात आल्यानंतर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी शोभा यांची भेट घेतली होती. आणि यानंतर शोभा यांना भारताविरोधात हा लेख लिहिला होता. मात्र, शोभा डे यांनी बासित यांनी केलेले हे आरोप फेटाळून लावले आहे.

अब्दुल बासित यांनी केलेला दावा फेटाळून लावताना शोभा डे म्हणाल्या की, ”मी एक देशभक्त भारतीय नागरिक आहे. बासित यांनी केलेल्या आरोपांमुळे अपमानित झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे.” अब्दुल बासित हे २०१४ मध्ये भारतात उच्चायुक्त म्हणून नियुक्त झाले होते.

नेमके काय आहे प्रकरण

बासित अली यांनी हल्लीच ट्विटरवर एक मुलाखत शेअर असून या मुलाखतीत त्यांना हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, ” २०१६ मध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हाण वानीच्या खात्म्यानंतर करण्यात आला. मात्र भारतीय पत्रकारांकडून याबाबत फार काही लिहिले जात नव्हते. त्यावेळी कुठल्याही भारतीय पत्रकाराला काश्मीर प्रश्नावर लेख लिहण्यास नकार दिला.  मात्र शोभा डे यांनी काश्मीर प्रश्नवर लेख लिहला  ‘बु-हान वाणी इज डेड बट ही विल लिव्ह ऑन टील वी फाईंड आऊट व्हॉट काश्मीर रियली वांट’ या मथळ्याखालील हा लेक शोभा डे यांनी पाकिस्तानच्या इशा-यावरून लिहीला होता, असा दावा अब्दुल बासित यांनी केला आहे. त्यामुळे आता शोभा डे यांच्याविरोधात नाव वाद सुरू झाला आहे.

 

 

Related posts

गेल्या ५ वर्षांत मोदींनी देशाची वाट लावली, पुढेही तेच करतील !

News Desk

मंदिर परिसरात प्लॅस्टिक आढळल्यास गुन्हा दाखल करणार !

News Desk

#PulwamaAttack : हे ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांचे अपयश !

News Desk