HW News Marathi
राजकारण

स्वप्ने अशीच दाखवा जी पूर्ण करता येतील, गडकरींचा भाजपला घरचा आहेर

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे. “लोकांना स्वप्ने दाखवणारे नेते चांगले वाटतात. मात्र त्यांनी जर दाखवलेली स्वप्ने पूर्ण केली नाही तर जनता त्यांची पिटाई केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे स्वप्ने अशीच दाखवावीत जी पूर्ण करता येऊ शकतील”, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

“मी खोटी स्वप्ने दाखवणाऱ्यांपैकी नाही. मी जे बोलतो ते मी १०० टक्के पूर्ण करूनच दाखवतो”, असेही गडकरी यावेळी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या या भाजपला घरचा आहेर देणाऱ्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. गडकरी अनेकदा आपल्या पक्षातील नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची जाहीर सभांमध्ये कानउघडणी करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच ‘नकारघंटा’ वाजवते तेव्हा काळ्या पैशाचे गूढ आणखीनच वाढते !

News Desk

कॉंग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

News Desk

“वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचा महाराष्ट्राशी सामंजस्य करार झाला नव्हता”, उदय सामंतांचा धक्कादायक खुलासा

Aprna