नवी दिल्ली | भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कलाकारांमध्ये अजून भर पडली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी आज (२६ एप्रिल) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपमध्ये नुकतेच अभिनेता सनी देओल सामील झाले असून त्यांना पंबाजच्या गुरुदासपूरमधून उमेदवारी देखील मिळाली आहे. परंतु भाजपने अद्याप दलेर मेहंदी यांच्याकडे नक्की कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी सोपविणार याबद्दल अधिकृत अशी माहिती मिळालेली नाही.
Singer Daler Mehndi joins Bharatiya Janata Party (BJP) in presence of BJP North West Delhi candidate Hans Raj Hans and Union Minister Vijay Goel. pic.twitter.com/1qeYIS44JG
— ANI (@ANI) April 26, 2019
तसेच दलेर मेहंदीचे व्याही आणि प्रसिद्ध सुफी गायक हंसराज हंस यांनी देखील भाजपप्रवेश केला असून उत्तर पश्चिम दिल्लीतूनल उमेदवारी मिळली आहे. दलेर यांची मुलगी अजित कौर मेहेंदीचा विवाह हंसराज हंस यांचा मुलगा नवराज हंससोबत झाला आहे. हंसराज हंस हे देखील प्रसिद्ध पंजाबी गायक आहेत.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, भाजपचे उत्तर पश्चिम दिल्लीतील उमेदवार हंसराज आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जर भाजपने दलेर यांना पंजामधून उमेदवारी दिली तर त्यांच्या लोकप्रियतेचा भाजपला चांगलाच फायदा होईल.कारण पंजाबमध्ये म तर त्यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. बोलो ता रा रा, तुनक तुनक तुन, हो जायेगी बल्ले बल्ले यांसारखी त्यांची अनेक गाणी प्रचंड हिट आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.