HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने आज (२३ मार्च) आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश आहे. पुण्याच्या बहुचर्चित अशा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, काल (२२ मार्च) जाहीर झालेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीत दीव-दमण या एकाच मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले होते. लालूभाई पटेल हे दीव-दमण येथून लढणार असल्याचे भाजपने शुक्रवारी जाहीर केले.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून पुण्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी तर कालच स्वगृही परतलेल्या डॉ. भारती पवार या दिंडोरीमधून लढणार आहेत. निवडणूक समितीची काल रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. या बैठकीनंतर भाजपने एकूण ३६ उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. भाजपच्या या तिसऱ्या यादीत आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि ओडिशामधील उमेदवारांचा समावेश आहे. या एकूण ३६ पैकी ६ उमेदवार महाराष्ट्रातील आहेत.

भाजपच्या तिसऱ्या यादीतील महाराष्ट्राच्या ६ उमेदवारांची नावे 

उमेदवारांची नावे                               मतदारसंघ

गिरीश बापट                                           पुणे
प्रताप चिखलीकर                                   नांदेड
स्मिता उदय वाघ                                  जळगाव
डॉ. भारती पवार                                    दिंडोरी
कांचन राहुल कुल                                 बारामती
जयसिद्धेश्वर स्वामी                                 सोलापूर

Related posts

दोनदा मतदान करण्याचा सल्ला, भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना भोवला

News Desk

पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात !

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपमधून बाहेर पडणे वेदनादायी !

News Desk