HW News Marathi
राजकारण

मला कमळासमोरचे बटण दाबायचे होते पण…!

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीसाठी आज (६ मे) सात राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यातील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात एका वृद्ध महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने बटण जबरदस्ती दाबला त्यांनी केला आहे. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर बुथ कॅप्चरींगचा आरोप केला आहे. स्मृती इराणी यांनी याबाबतचा एक व्हिडीओही त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून ट्वीट केले आहे. काँग्रेसला मतदान करण्यासाठी आपल्यावर सक्ती करण्यात आली असल्याचा आरोप एका महिलेने या व्हिडीओमध्ये केला आहे. तसेच निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाला याविरोधात कारवाई करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे.

विवेक माहेश्वर नावाच्या युझरने एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत वृद्ध महिला म्हणत आहे की, ‘माझा हात पकडला आणि पंजाचे बटण जबरदस्ती दाबले. मला तर कमळाचे बटन दाबायचे होते’. हा प्रकार गौरीगंजच्या गुजरटोला बूथ क्रमांक ३१६ येथील ही घटना आहे. येथील अधिकाऱ्यांने जबरदस्ती काँग्रेसला मतदान करण्यास सांगितल्याचा असा आरोप या ट्वीटमध्ये करण्यात आला आहे. हे ट्वीट युझरने स्मृती इराणी, निवडणूक आयोग आणि अमेठीच्या जिल्हाधिकाऱ्यांना टॅग करण्यात आले आहे. यानंतर स्मृती इराणी हे रिट्वीट करत म्हटले की, इशारा निवडणूक आयोग आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बूथ कॅप्चरिंग करणे असे वक्य लिहले आहे.

याप्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आयोग आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित आणि कडक कारवाई करावी अशी मागणी स्मृती इराणी यांनी केली आहे. अमेठी या मतदार संघात एकूण २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु खरी लढत ही राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी यांच्यातच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ पवार, रोहित पवार आगामी निवडणूक लढविणार नाहीत !

News Desk

राष्ट्रगीत असताना वंदे मातरम् कशाला ?

swarit

#Elections2019 : जाणून घ्या…कल्याण मतदारसंघाबाबत

Atul Chavan