HW Marathi
राजकारण

…म्हणून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता भासू शकते !

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (८ जून) हिंसाचार झाला. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे, राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी सोमवारी (९ जून) पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची ची भेट घेतली. “सध्या पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार सुरु आहे तो पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता भासू शकते”, असे विधान राज्यपाल त्रिपाठी यांनी केले आहे. मोदी आणि शहांच्या यासंदर्भात घेतलेल्या भेटीबाबतची माहिती त्रिपाठी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान दिली.

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी झालेल्या हिंसाचारात भाजपचे ५ कार्यकर्ते मृत्यूमुखी पडल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. तर आपले ६ कार्यकर्ते बेपत्ता झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला. यामुळे भाजप-तृणमूल काँग्रेसचा संघर्ष आणखीच चिघळला. खरंतर, लोकसभा निवडणुकांपासूनच पश्चिम बंगालमध्ये सतत भाजप-तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष सुरु आहे. लोकसभेच्या प्रचारदरम्यानही राज्यात मोठा हिंसाचार झाला. इतकेच नव्हे तर लोकसभेच्या निकालानंतरही हा हिंसाचार थांबला नाही. उलट, आणखीच वाढला. लोकसभेच्या निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचारात तब्बल १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्यपाल त्रिपाठी यांनी दिली आहे.

Related posts

लॉकडाऊनबाबात मुख्यमंत्री आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता – अस्लम शेख

News Desk

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

News Desk

#RamMandir : उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे इव्हेंट !

News Desk