HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

म्हणून… राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१२ एप्रिल) अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभेसाठी आले होते. मोदींच्या उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अनुउपस्थिती यांचा भाजप प्रवेश ही एक अफवाच ठरली

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरमधून काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मोदी आज त्यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये आले होते.

भाजपमध्ये प्रवेश केल्यास राधाकृष्ण विखेंचे विरोधी पक्षनेते पद व आमदारकी हातातून गेली असती. त्यामुळे घाई न करता सुजय विखे निवडून आल्यानंतर खासदारकी घरात असेल. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यास सोईचे होणार असल्याने विखेंचा भाजप प्रवेश टळला असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

 

Related posts

मध्य प्रदेशसह राजस्थानच्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेत्यांची हजेरी

News Desk

…मग पाटीदारांना आरक्षण का नाही ?

News Desk

पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे !

News Desk