HW Marathi
राजकारण

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा

मुंबई | विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्त केला आहे. आता पक्षश्रेष्ठी पुढे काय निर्णय घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  विखे-पाटील यांच्या मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुजय यांच्या प्रवेशानंतर विखे- पाटील यांच्या राजीनामावर अनेक चर्चा रंगल्या होत्या.

काँग्रेसने गुरुवारी (१४ मार्च) पहिल यादी जाहीर केली होती. त्यावेळी विखे-पाटील यांना त्यांच्या राजीनामाच्या चर्चेबदद्ल पत्रकारांनी विचरले होते. तेव्हा विखे-पाटील म्हणाले की, “मला पक्षाकडून स्पष्टीकरणाबाबत विचारले नाही. पक्ष जी भूमिका घेईन ती मी पार पाडेन. राजीनामा बाबतीत काहीही चर्चा झालेली नाही. मी राजीनामा देणार नाही” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट दिले होते.

 

Related posts

अरुण गवळीला हवी २८ दिवसांची संचित रजा

News Desk

किर्ती आझाद यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

News Desk

सरकारच्या हुकुमशाहीविरोधात प्रदेश काँग्रेस सेवादलाची तिरंगा पदयात्रा

News Desk