HW News Marathi
राजकारण

…म्हणून त्यांना केंद्रातील सरकार कमकुवत हवे आहे !

नवी दिल्ली | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला शह देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. याच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “तुम्हाला तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा प्रधानसेवक हवा आहे का ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. विरोधकांना केवळ त्यांची दुकाने चालवायची आहेत. म्हणूनच त्यांना केंद्रातील सरकार कमकुवत हवे आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे आहे.

पंतप्रधान मोदी भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. “केंद्रात कमकुवत सरकार असावे. जेणेकरून त्यांना घोटाळे करता येतील आणि त्यांचे दुकान चालेल”, हीच त्यांची इच्छा असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. तुम्हाला तुमचे पैसे चोरून स्वतःसाठी वापरणारा प्रधानसेवक हवा आहे का ? शेजाऱ्यांच्या घरात जाऊन तुमच्या घरातल्या गोष्टी सांगणारा प्रधानसेवक तुम्हाला हवा आहे का?’, असे अनेक सवाल पंतप्रधान मोदींनी यावेळी जनतेला विचारले.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या विरोधकांच्या महाआघाडीवर पंतप्रधान मोदींनी टीका करताना मोदी म्हणाले कि, “जे पक्ष पूर्वी काँग्रेसच्या विरोधात होते. ज्यांची विचारधारा काँग्रेसशी जुळत नव्हती ते पक्ष आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, शहाणपणा शिकवण्याची गरज नाही !

News Desk

उन्हाचा ‘ताप’ आणि निवडणुकीचा ‘ज्वर’ एकदमच वाढू लागला आहे !

News Desk

प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार दाखल

News Desk