नवी दिल्ली | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने आज (२४ एप्रिल) फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालायाचे काम नसून ते निवडणूक आयोगाचे काम आहे. आरोपींना निवडणूक लढण्यापासून न्यायालय रोखू शकत नाही असे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Special NIA Court: In ongoing elections this Court does not have any legal powers to prohibit anyone from contesting elections,It is job of electoral officers to decide. This court can't stop the accused number 1 from contesting elections, this application is negated https://t.co/00zQNRqxME
— ANI (@ANI) April 24, 2019
विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या याचिकाकर्त्यांना कोणताही आर्थिक दंड न आकारता निव्वळ समज देण्यात आली आहे. एनआयएला न्यायालयाने कान टोचले आहे. “आम्ही साध्वीला क्लीन चीट दिलेली आहे, हे तुमच्या उत्तरात लिहायची काय गरज होती? यावर याचिकाकर्त्यांनी सवाल केलेला नव्हता. तसेच न्यायालयाला आरोपांत काहीतरी तथ्य वाटले म्हणूनच साध्वीवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत, हे लक्षात ठेवा,” असे कोर्टाने म्हटले आहे.
विशेष एनआयए न्यायालयाने निवडणूक न लढविण्याची फेटाळून लावली. काँग्रेसने माझ्याविरुद्ध रचलेले षडयंत्र होते. परंतु शेवटी धर्मचा नेहमीच विजय होते, अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे.
BJP MP candidate from Bhopal, Pragya Singh Thakur on NIA court rejecting plea to ban her from contesting LS poll: Congress has been conspiring continuously but we will definitely win because truth and 'dharma' always wins. pic.twitter.com/Rg471l8nAI
— ANI (@ANI) April 24, 2019
नेमके काय आहे प्रकरण
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एका पीडितेच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने साध्वी यांच्याकडून उत्तर मागितले होते. यावर साध्वी यांनी ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. केवळ लोकप्रियतेसाठी केलेले हे काम असून याचिकाकर्त्याने न्यायालयाचा वेळ वाया घालवला आहे, यामुळे याचिकाकर्त्याकडून दंड वसूल करावा अशी मागणीही साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून करण्यात आली होती.
नाशिक जिह्यातील मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात सहा जण ठार तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. याप्रकरणी साध्वी प्रज्ञा यांच्यासह अनेक जणांना आरोपी ठरवण्यात आले होते. एनआयएने तपासानंतर साध्वी यांना क्लिनचीट दिली होती. पण अजूनही हा खटला न्यायालयात सुरू असून साध्वी सध्या जामिनावर आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.