HW News Marathi
राजकारण

अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबई | नेहमी वादाच्या भोवऱ्या राहणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केलेली आहे. सत्तारांचा सुप्रिया सुळेवर आक्षेपार्ह भाषेत टीका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांविरोधात आंदोलन सुरू केली असून सत्तारांनी येत्या 24 तासांत सुप्रिया सुळेंची नाक घासून माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान,  सत्तारांच्या गलिच्छ वक्तव्यावर राज्यभरातून टीका होत आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होती. यावेळी सभेचा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेल्या सत्तारांनी माध्यमांशी बोलताना आक्षेपार्ह भाषेत टीका केली. सत्तारांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर म्हणाले, “सत्तारांनी येत्या 24 तासांत सुप्रिया सुळेंची नाक घासून माफी मागावी. अन्यथा आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. सत्तारांना आम्ही त्यांची लायकी दाखवून देऊ.”

सुळेवर टीका करताना सत्तार काय म्हणाले

सुप्रिया सुळेंनी सत्तारांवर टीका करताना म्हणाले, “पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का?” सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत सत्तार म्हणाले, “ते तुम्हाला हवे आहेत का?, असे त्यांनी म्हटले. या विधाननंतर पुन्हा एकदा सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करत आहात”, असे म्हणत सत्तारांच्या ऑफरला त्यांनी उत्तर दिले. यावर उत्तर देताना सत्तारांची जिभ घसरली ते म्हणाले, “इतकी भिकारी*** झाली असेल तर सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ,” असे म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकपाल नियुक्तीसाठी आजपासून अण्णा हजारेंचे बेमुदत उपोषण

News Desk

प्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk

अमेठीतून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk