HW News Marathi
राजकारण

बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

मुंबई | शिवसेना नेते आणि सिद्धिविनायक मंदीर न्यासाचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. नुकत्याच झालेल्या उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीदरम्यान शिवसेनेला केंद्रात आणि राज्यात आणखी मंत्रिपदे देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली होती.

हल्लीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्री येथे भेटले होते. शहा उद्धव भेटीदरम्यान शिवसेनेला केंद्रात आणि राज्यात आणखी मंत्रिपदे देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे बोलले जात होते.

Related posts

लोकशाहीचे हे जिवंत रूप मानायचे की बेबंद लोकशाहीचे?

News Desk

निलंबनानंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

नरेंद्र मोदी-अमित शहा दोघांची जोडी कृष्णा-अर्जुनासारखी !

News Desk