HW News Marathi
Covid-19

पंढरपूरयेथील दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

पंढरपूर | पंढरपूर येथील दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे काल (१७ ऑगस्ट) निधन झाले. पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यानी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांचे निधन झाले. परिचारक यांनी २५ वर्ष महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी भूषवली होती. सुधाकरपंत परिचारक गेले २ दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे सर्व अंत्यविधी कोरोनाच्या नियमावलीत पुणे येथे पार पडतील, अशी माहिती नातू प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवरुन दिली आहे.

गेली ५० वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे, अशी भावनिक पोस्ट त्यांचे नातू प्रितीश परिचारक केली होती. “तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यामुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत आहे” असे ते म्हणाले होते.

गेल्या दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले. पंचाहत्तरी गाठल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी सुधाकरपंतांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करणं पसंत केलं होतं. २०१४ च्या निवडणुकीपासून परिचारकांनी राष्ट्रवादीसोबतही काडीमोड घेतला. मात्र कार्यकर्त्यांचा जोश पाहून गेल्या वर्षी सुधाकरपंतांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली.

सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. भाजपने तिकीट न दिल्यास अपक्ष लढा, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, मात्र भाजपने त्यांना तिकीट दिल्याने सुधाकरपंत पुन्हा राजकारणात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा जास्त, कोरोनामुक्त कमी

News Desk

माणुसकीचं नातं कसं जपावं हे तुम्ही दाखवलं ! जयंत पाटलांकडून कौतुक, निलेश लंके भावूक

News Desk

राज्यात आज ३३०७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर १३१५ जणांना डिस्चार्ज

News Desk