HW News Marathi
राजकारण

नाशिक पदवीधर मतदारसंघात ‘या’ तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज; राजकारणात एकच खळबळ

मुंबई | नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली होती. सुधीर तांबे यांच्या नावाने पक्षाकडून एबी फॉर्म देखील आला होता. परंतु, सुधीर तांबे (Dr. sudhir tambe) यांनी आपला उमेदवारी मागे घेत चिरंजीव आणि युवा काँग्रेसचे माझी अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातील वेगळे वळण आल्याने राज्याच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सुधीर तांबेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “सत्यजीत तांबेसारखे राज्यात जे तरुण मुले नेतृत्व करत आहेत. आणि या तरुणांना वेगवेगळ्या विषयाचे संखोल ज्ञान आहे. यामुळे निवडणुकीत हे नेतृत्व द्यावे, असे आमचे ठरले आहे. यामुळेच सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरला आहे.”

एबी फॉर्म वेळेत आला नाही म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला

माझ्या नावाने असलेला एबी फॉर्म वेळेत आला नाही. यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती स्वत: सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना केला आहे. सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, “अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी मी काँग्रेसचा उमेदवार आहे. महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेससाठी सोडली होती.”

 

संबंधित बातम्या

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांच्या कुटुंबातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही !

News Desk

#LokSabhaElections2019 : …आता दुसरी परीक्षा तुमची आहे दानवे !

News Desk

मधुकर कुकडेंनी घेतली शरद पवारांची भेट  

swarit