HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील यांनी दाखल केले ४ उमेदवारी अर्ज

अहमदनगर | लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या, दुस-या टप्प्याती अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. बहुचर्चित अशा अहमदनगर जागेचे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. सुजय विखे-पाटील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्या पाठोपाठ अजून एका दाम्पत्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे दाम्पत्य दुसरे, तिसरे कोण नसून नुकतेच भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि त्यांची पत्नी आहे. काही कारणास्तव उमेदवारी अर्ज रद्द झाल्यास आपल्या कुटुंबातील उमेदवारी अर्ज कायम रहावा. यासाठी डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचे म्हटले जात आहे.

माजी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर सुजय विखे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विषेश म्हणजे सुजय विखे पाटील यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सुजय विखे-पाटील यांचा चार उमेदवारी अर्ज भरण्या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु, सुजय यांच्या उमेदवारी अर्जानंतर त्यांच्या पत्नीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.

काही कारणास्तव सुजय यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यास, उमेदवारी रद्द होईल. या भीती पोटी सुजय विखे यांनी पत्नीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले असल्याचे बोलले जाते. वास्तविक पाहता डॉ. सुजय विखे यांनीच चार अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्जात चूक निघाल्यास उमेदवारी रद्द होण्याची शक्यता असते. कुटुंबातील एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात राहावी याकाणामुळे सुजय विखे यांनी चार अर्ज दाखल केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

.

 

Related posts

बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा ही आपुलकी दिसली नाही

News Desk

एअर स्ट्राइकमुळे लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या २२ जागा येतील

News Desk

कर्नाटकात मराठी तरुणांवर अमानुषपणे लाठीचार्ज

Gauri Tilekar