HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

१०० टक्के सोमय्यांविरोधात निवडणूक लढविणार, सुनील राऊत यांचे किरीट सोमय्यांना आव्हान

मुंबई | भाजप खासदार किरीट सोमय्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु, उद्धव ठाकरेंकडून अद्याप त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आली नसून टाळाटाळ केली जात असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी किरीट सोमय्या यांना थेट आव्हान दिले आहे. “गरज पडलीच तर मी अपक्ष लढेन. पण मी १०० टक्के सोमय्यांविरोधात निवडणूक लढविणार,’ असे सुनील राऊत यांनी स्पष्ट केले आहे. किरीट सोमय्यांची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांदरम्यान किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यानंतर, संतापलेल्या शिवसैनिकांनी या लोकसभा निवडणुकांमध्ये किरीट सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. युती झाली तरीही शिवसैनिक सोमय्या यांचा प्रचार करणार नाहीत, असे शिवसेना-भाजपची युती होण्याच्या बऱ्याच दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते.

Related posts

उल्टा चोर चौकीदार को डांटे, मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

News Desk

#LokSabhaElections2019 : राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार ?

News Desk

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या अडचणी सोवडविण्याबाबत मुख्यमंत्र्याचे निर्देश

News Desk