नवी दिल्ली | भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान झालेल्या ३६ राफेल डीलचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली केला जावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिका आज रद्द केल्या आहेत. राफेल करारात कोणतीही अनियमितता नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सर्व याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डीलवरून मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाल्या होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयामुळे राहुल गांधी यांनी सर्वात मोठा फटका बसला आहे.
Supreme Court dismisses all the petitions seeking a court-monitored investigation into the Rafale deal. pic.twitter.com/qDHSTWIxrF
— ANI (@ANI) December 14, 2018
Supreme Court: We don’t find any material to show that it’s commercial favouritism #RafaleDeal
— ANI (@ANI) December 14, 2018
सरन्यायाधीश रंजन गोगोई, संजय किशन कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने दाखल केलेल्या याचिकांवर आज(१४ डिसेंबर) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी वेळी सरन्यायाधीशांनी या याचिका फेटाळून लावल्या, राफेल प्रकरणात हस्तक्षेप करण्यात सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विमान खरेदी प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नाहीत.सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.