नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर रविवारी (१९ मे) तत्पूर्वी निकालांचे एक्झिट पोल जाहीर झाले. या एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर व्हीव्हीपॅट मतदानाची १०० टक्के मतमोजणी करावी असी मागणी करणारी विरोधकांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. येवढेच नव्हे तर सतत याच विषयांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नसल्याचे सांगत, न्यायालयाने याचिकाकर्त्यांला सुनावले आहे.
Coming down heavily on the petitioner, Justice Mishra, while dismissing the petition, said, "Won't entertain such kind of plea over&over again. We can't come in the way of people electing their representatives." The Justice also termed the move of the petitioner, a "nuisance" PIL https://t.co/bzylpgmaBP
— ANI (@ANI) May 21, 2019
विरोधकांची आज (१२ मे) ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यानंतर विरोधक ईव्हीएम संदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. ईव्हीएमवर घेतलेल्या संशयावरुन निवडणूक आयोगाने यूपीतील 4 याचिका फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएम सुरक्षित असून त्यावर विश्वास ठेवावा असं निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.