HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

ममतांचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या महिलेची सर्वोच्च न्यायालयाने केली सुटका

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर शेअर करणाऱ्या भाजप कार्यकर्त्या प्रियांका शर्मा यांची सुटका केली आहे. ममता बॅनर्जी यांचा चेहरा मॉर्फ करून तयार करण्यात आलेले वादग्रस्त मिम सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारने प्रियांका शर्मा यांना अटक करुन १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही १४ दिवसांची कोठडी रद्द करत प्रियांका यांना ममता बॅनर्जी यांची माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेत पार पडलेल्या मेटगाला या फॅशन शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीने केलेल्या विचित्र मेकअपमुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. प्रियंकाच्या या मेकअपमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर विनोद आणि मिम्स व्हायरल झाले. प्रियांकाच्या मेटगालामधील अशाच एका फोटोमध्ये ममता बॅनर्जी यांचा चेहरा मॉर्फ करून लावण्यात आला. सोशल मीडियावर हे मिम प्रचंड व्हायरल झाले. प्रियांका शर्मा यांनी देखील हे मिम आपल्या फेसबुकवर शेअर केले. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने प्रियांका शर्मा यांना अटक करून १४ दिवसांची कोठडी सुनावली होती.

Related posts

#LokSabhaElections2019 : काँग्रेसची पाचवी उमेदवार यादी जाहीर

News Desk

‘ते’ १५ लाख लोकांच्या खात्यात हळूहळू जमा होतील !

News Desk

देशात ६० वर्षांमध्ये काही झालेच नसते, तुम्ही सोशल मीडियातून खोटा प्रचार कसा केला असता !

News Desk