HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

ठाकरे कुटुंबियांकडून रोशनी शिंदेंची भेट; तब्येतीची केली विचारपूस

मुंबई | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंची (Roshni Shinde) ठाण्यात जाऊन भेट घेतली.  शिंदे गटांच्या महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदेंना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे जखमी झाली असून त्यांच्यावर ठाण्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) रोशनी शिंदेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतेची विचारपूस केली.

दरम्यान, मारहाण झाल्यानंतर रोशनी शिंदेंना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या रोशनी शिंदेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी रोशनी शिंदेंची भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे हे ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.  फेसबुकवरील पोस्टवरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्याची माहिती माध्यमातून समोर येत आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी सायंकाळी ऑफिसमधून घरी परतत असताना. रोशनी शिंदेंच्या कार्यलयाच्या परिसरात शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून हा संपूर्ण प्रकर रोशनी शिंदेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे या जखमी झाल्या होत्या.  यानंतर रोशनी शिंदेंना उपचारासाठी ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

Related posts

PandharpurElection : भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित!

News Desk

उर्मिला मातोंडकर या शिवसैनिकच आहेत – संजय राऊत

News Desk

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत चिपळूण दौऱ्यावर असतांना महत्वपूर्ण घोषणा…!

News Desk