HW News Marathi
राजकारण

गेल्या ५ वर्षात सुप्रिया सुळेंसह शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत वाढ

नवी दिल्ली | २०१४ मध्ये निवडणुकीत निवडून संसदेत गेलेल्या १५३ खासदारांच्या संपत्तीत १४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बीजू जनता दलाचे (बीजेडी) पिनाकी मिश्रा या तिघांचा नंबर आहेत. या तिन्ही खासदारांच्या सरासरी संपत्ती १३.३२ कोटी रुपये आहे. या सर्व खासदारांची माहिती इलेक्शन वॉच आणि असोशिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे.

भाजपचे खासदार श्रत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत सर्वाधिक म्हणजे ११६.७३ कोटींनी वाढ झाली आहे. सिन्हा यांची संपत्ती २००९ मध्ये १५ कोटी होती. तर २०१४ मध्ये त्यांची संपत्ती १३१ कोटी रुपयांवर पोहचली. त्यानंतर बीजेडीचे खासदार पिनाकी मिश्रा यांच्या संपत्तीत १०७ कोटींनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये त्यांची संपत्ती १३७ कोटी होती. तर त्यानंतर संपत्तीत वाढ होणाऱ्या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. त्यांची २००९ मध्ये संपत्ती ५१ कोटी होती. तर २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ११३ कोटी रुपयांवर गेली. पाच वर्षांमध्ये २००९ ते २०१४ या कालवधीत १५३ खासदारांच्या संपत्तीत सरासरी ७ कोटी ८१ लाखांची वाढ नोंदवली गेली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांच्या निवासस्थानी ED चे पथक दाखल; ‘या’ प्रकरणी अटक होणार?

Aprna

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेत आणखी २२ जागा सील करणार

News Desk

#LokSabhaElections2019 : रमजान महिन्यात येणाऱ्या तारखांना मुस्लिम धर्मगुरूचा आक्षेप, आयोगाचे स्पष्टीकरण

News Desk