नवी दिल्ली | “२०१४ मध्ये मुलायम सिंग यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या वेळी असेच म्हटले होते,” अशा शब्दात राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील आज (१३ फेब्रुवारी) शेवटचे भाषण होते. मोदींच्या भाषणा आधी मुलायमचे भाषण झाले, त्यावेळी “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो,” असे त्यांनी म्हटले.
Supriya Sule, NCP on Mulayam Singh Yadav's remark in Lok Sabha, 'I wish you (PM Modi) become PM again': I have heard that respected Mulayam Singh ji had said the same thing for Manmohan Singh ji in 2014. pic.twitter.com/ftsciHmOzU
— ANI (@ANI) February 13, 2019
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच मी त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा देतो”, असे अत्यंत धक्कादायक विधान मुलायम सिंग यादव यांनी लोकसभेत केले आहे. या विधानामुळे मुलायम सिंग राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
#WATCH Samajwadi Party's Mulayam Singh Yadav in Lok Sabha, says, "PM ko badhaai dena chahta hun ki PM ne sabko saath lekar chalne ka pura prayas kiya. Main chahta hun, meri kamna hai ki saare sadsya phir se jeet kar aayen aur aap (PM) dobara pradhan mantri banein." pic.twitter.com/j6Bnj9Kr3p
— ANI (@ANI) February 13, 2019
मुलायम सिंग यांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा देताना, त्यांच्या शेजारी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी बसल्या होत्या. यावेळी सोनिया यांना आपले हसू अनावर झाले. परंतु त्यांनी मुलायम बोलत असताना त्यांच्याकडे पाहिले देखील नाही. त्यामुळे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस वेगळे झाल्याचे चिन्हे लोकसभेत दिसून आले. तर मोदींनी मुलायमच्या शुभेच्छांचे नमस्कार करून हस्त मुखाने अभिवादन केले आहे. सभागृहातील सर्व खासदारांनी बेंच वाजून आनंद व्यक्त केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.