HW News Marathi
राजकारण

तीन वर्षात महाराष्ट्रात स्त्रीभ्रृण हत्येचं प्रमाण वाढले- सुप्रिया सुळे

तीन वर्षात महाराष्ट्रात स्त्रीभ्रृण हत्येचं प्रमाण वाढले आहे त्यामुळे राज्यातील मुलींची संख्या घटल्याचे नीती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढाओ अशी भल्यामोठया जाहीराती केल्या जात आहेत आणि दुसरीकडे मुलींची संख्या घटत आहे. त्यामुळे आज लेकी नको गं म्हणण्याची वेळ राज्यातील लोकांवर आलीय की काय अशी शंका मला येते असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत व्यक्त करतानाच सरकारबद्दल संतापही व्यक्त केला.त्यांनी या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव देण्याचा आणि सटाणा कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

सभेमध्ये युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्रामकोतेपाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले.
सभेच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे सटाणा ठिकाणी प्रवेश करतानाच जोरदार स्वागत करण्यात आले.सभेच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांना प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे ,खासदार सुप्रिया सुळे,धनंजय मुंडे यांनी अभिवादन केले.
या सभेमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे ,खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,खासदार सुप्रिया सुळे,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार दिपिका चव्हाण,आमदार पंकज भुजबळ, आमदार जयंत जाधव, आमदार जयदेव गायकवाड,जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार,युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार संजय चव्हाण,माजी खासदार आनंद परांजपे,रंजन ठाकरे,अविनाश आदीक,प्रेरणा बलकवडे, आदींसह बागलाण आणि सटाणा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहा मुंबईत दाखल

News Desk

अजित पवारांच्या बंगल्यावर ‘मविआ’ची बैठक सुरू; उद्धव ठाकरेंसह महत्वाचे नेते बैठकीला हजर

Aprna

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळांना तुर्तास दिलासा 

News Desk