HW News Marathi
राजकारण

अजित पवारांच्या बंगल्यावर ‘मविआ’ची बैठक सुरू; उद्धव ठाकरेंसह महत्वाचे नेते बैठकीला हजर

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहे. अजित पवार यांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या इतर महत्वाचे नेतेही अजित पवारांच्य देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीची शनिवारी (17 डिसेंबर ) होणाऱ्या महा मोर्चासंदर्भात मविआच्या नेत्यांची आज (15 डिसेंबर) बैठक सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या महा मोर्चाला शासनाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. आणि हा मोर्चा जे. जे फाईओवरपासून ते सीएसएमटीपर्यंत महामोर्चा काढता येणार आहे.  महाविकास आघाडीच्या या महा मोर्चासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरातून येणार आहेत. तर या मोर्चा सहभागी होण्यासाठी काही संघटना देखील येणार आहेत.

या मोर्चामध्ये 1 लाख कार्यकर्ते येतील अशी माहिती मिळत आहे.  या पार्श्वभूमीवर आज देवगिरीवर सर्व नेत्यांची बैठक आयोजित केलेली आहे.  महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाली नसली तरी तयारी आणि नियोजनासाठी ही महत्वाची बैठक आहे.

 

Related posts

मराठा आरक्षणावरून विरोधकांचे राजकारण | मुख्यमंत्री

News Desk

मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान, महाआघाडी ठरणार कुचकामी !

News Desk

Breaking News : राफेल डीलची याचिका न्यायालयात रद्द, काँग्रेसला मोठा धक्का

News Desk