HW News Marathi
राजकारण

परळीत फक्त बहिणीचीच हवा, भावांनी लक्षात ठेवा !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार ऐन रंगात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. यंदाच्या विधानसभेत परळी मतदारसंघात मुंडे भाऊ-बहिणीमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. “धनंजय मुंडेंनी पुढची २५ वर्षे हरण्याची तयारी ठेवावी. परळीत फक्त बहिणीची हवा आहे हे भावांनी लक्षात ठेवावे”, असे म्हणत बीड जिल्ह्यातील भाजपचे नेते सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे परळी मतदारसंघाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघातून जिंकून येण्यासाठी धनंजय मुंडे आपली संपूर्ण ताकद पणाला लावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

“मागच्या दराने येणाऱ्याला पुढचा दरवाजा दिसणार नाही. ए भावा कुणाची हवा ? परळीत तर फक्त बहिणीचीच हवा, हे भावांनी लक्षात ठेवावे”, असे सुरेश धस म्हणाले. “बीड जिल्ह्यात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, अमित शाह आणि पंकजा मुंडे यांचाच गाजावाजा आहे. भाजपमध्ये मेगाभरती तर राष्ट्रवादीत मेगा गळती सुरु आहे”, असा टोलाही देखील सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना लगावला आहे. शरद पवार यांनी १८ सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बीडमधील ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. यात परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावातून माजी मंत्री प्रकाश सोळंके व केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी नमिता मुंदडा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामा हल्ला नसून ती तर ‘दुर्घटना’

News Desk

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

News Desk

पंढरपूरच्या सभेतून शिवसेना फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

News Desk