HW News Marathi
राजकारण

संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई | ‘टायगर इज बॅक’ असे ट्वीट करत प्रतिक्रिया शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी आनंद व्यक्त केला. तसेच ठाकरे गटाकडून गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

सुषमा अंधारेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘टायगर इज बॅक’ असे लिहिले असून ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि सामना ऑनलाईनला टॅग केले आहे. दरम्यान, राऊतांसह प्रवीण राऊत यांना देखील जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने राऊतांना 2 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात राऊतांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी ईडीने राऊतांच्या जामीन स्थगितीसाठी आजच्या सुनावणीदरम्यान जोरदार युक्तीवाद केला होता. यापूर्वी राऊतांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली. यानंतर न्यायालयाने आजच्या सुनावणीत लेखी स्वरुपात उत्तर राखून ठेवला होता. यावर आज सुनावणीदरम्यान न्यायधीश एम. जी. देशपांडेंनी ऑर्डरची कॉपी वाचली आणि त्यावर सही केली आणि त्यानंतर न्यायाधीशांनी प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांना जामीन मंजूर केल्याचे सांगितले.

न्यायालयात युक्तीवाददरम्यान नेमके काय झाले

एएसजी अनिल सिंग हे न्यायालयात ईडीचे वकील जे राऊतांविरोधात युक्तीवाद करत आहेत. अनिल सिंग यांनी न्यायालयासमोर विनंत केली की, “राऊतांच्या जामीन अर्जावर स्थगिती आणण्यासाठी त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य करावा. जेणे करून ईडीला राऊतांच्या जामीन अर्जाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आम्हाला म्हणजे ईडीला संधी मिळायलाच हवी, अशी मागणी त्यांनी केली. कारण हे छोटे मोठे प्रकरण नसून यात मोठी नावे सहभाग आहे. या आठवड्यात न्यायालयाचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर आठवड्याभराची स्थगिती द्यावी, ज्यामुळे ईडी निकालाचा अभ्यास करून पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात दाद मागू शकेल, अशा युक्तीवाद ईडीचे वकील सिंग यांनी केला.”

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Related posts

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी डी. के. शिवकुमार यांनी ईडीकडून अटक

News Desk

शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत ?

News Desk

हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

News Desk