HW Marathi
राजकारण

सुषमा स्वराज २०१९ च्या लोकसभा निवडणुका लढविणार नाहीत

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुका लढविणार नसल्याची मोठी घोषणा भाजपच्या नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांना आपण स्वतः याबाबत माहिती दिली असून याबाबतचा निर्णय पक्ष घेईल, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले आहे. इंदूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज यांनी ही घोषणा केली आहे. सुषमा स्वराज या मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातील खासदार आहेत.

दरम्यान, भाजपकडून सुषमा स्वराज यांना राज्यसभेवर पाठविण्यात येऊ शकते, अशीही चर्चा होत आहे. सुषमा स्वराज यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुषमा स्वराज निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगात होती. मात्र, आता सुषमा स्वराज यांनी स्वतःच याबाबत घोषणा केली आहे.

Related posts

नागपूरातून ५ कोरोना संशयित हॉस्पिटलमधून पसार

rasika shinde

जे आमच्यावर भूंकत आहेत त्यांच्या मनात भीती आहे!

News Desk

पंतप्रधान मोदींनी आपला शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा !

News Desk