HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणारा आयएएस अधिकारी निलंबित

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या एका आयएएस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याने या आयएएस अधिकाऱ्यावर बुधवारी (१७ एप्रिल) निवडणूक आयोगाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मोहम्मद मोहसिन असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या संबलपूर लोकसभा मतदारसंघातील सभेदरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीसाठी पंतप्रधानांना १५ मिनिटे थांबावे लागले होते. मोहम्मद मोहसिन यांनी एसपीजी सुरक्षेअंतर्गत मान्यताप्राप्त व्यक्तींसाठीच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. एसपीजी सुरक्षेतील व्यक्तींची अशा प्रकारे तपासणी केली जात नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय चिटणीसपदाची जबाबदारी आमदार हेमंत टकलेंवर

News Desk

मनसेकडून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देऊन सेना-भाजपला प्रेमाचा चिमटा

News Desk

युट्युब चॅनेल विरोधात विखे पाटलांची पोलिसात तक्रार

News Desk