मुंबई | “माफ करा राजे..तुमच्या नवाने राजकारण करणाऱ्यांना..तुमचा इतिहास आणि त्या भगव्याचे महत्व कळलेच नाही !! आपल्याच रयतेला फसवून..स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही!!,” अशा खोचक शब्दात स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी काल (१८ फेब्रुवारी) झालेल्या शिवसेना-भाजप युती घोषणेनंतर त्यांनी ट्वीट करून टीकास्त्र सोडले आहेत.
माफ करा राजे..
तुमच्या नवाने राजकारण करणाऱ्यांना..तुमचा इतिहास आणि त्या भगव्याचे महत्व कळलेच नाही !!
आपल्याच रयतेला फसवून..
स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही!!
— nitesh rane (@NiteshNRane) February 18, 2019
आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद हा आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राणेंवर टीका करायला शिवसेना विसरत नाही तर शिवसेनेचे वाभाडे काढायला नितेश राणे नेहमीच तयार असतात, असे चित्र नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळाले आहे. आता नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या चांगलाच समाचार घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीची नितेश राणेंनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लफडे जुनेच आहे. आता, नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली, असा घणाघात सामनामधून भाजपावर करण्यात आला होता. नितेश राणेंनी सामनातील या अग्रलेखाचा दाखले देत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले. बायको असावी तर शिवसेनेसारखीच…. असे ट्विट राणेंनी केले होते.
असंख्य नवरे बोलत असतील..
बायको शिवसेने सारखी पाहिजे!!
लफडी कळली तरी सोडत नाही..
जास्तच जास्त तर काय..एक सामन्यातून अग्रलेख!!
बाकी संसार सुरु!!— nitesh rane (@NiteshNRane) December 31, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.