HW Marathi
राजकारण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ११ नोव्हेंबरला चक्काजामचा इशारा

सांगली | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ११ नोव्हेंबरला सर्व ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा आज (बुधवार) सांगलीत दिला आहे. या आंदोलनाच्या काळात महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून सर्वच गावांमध्ये पूर्ण बंद पाळण्यात येणार असून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

यंदाच्या ऊस हंगामात अजूनपर्यंत कोणताही उपाय निघालेला नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी आता परस्परच हंगाम सुरू करण्याचे ठरविले आहे. कोणताही उपाय न काढता हंगाम सुरू करण्याचा परस्पर प्रयत्न हाणून पाडू, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. आता पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरु करु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. त्याचप्रमाणे जर कारखाने सुरु झाले तर एकरकमी ३२१७ रुपये मान्य असे समजू, असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Related posts

शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव दिलेला नाही | दानवे

News Desk

राज्यपालांच्या भाषणादरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेत मोठा गदारोळ

News Desk

योगींचा अजब दावा भगवान हनुमान दलित

News Desk