HW News Marathi
राजकारण

जाधवांची भेट घेणे ठाकरेंनी नाकारले

मुंबई | मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेले शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर गेले होते मात्र त्यांना भेटण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला. मराठा आरक्षणाबाबत सोमवारी उद्धव ठाकरेंनी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना भाजपसोबत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मराठा आरक्षणाबाबत सेनेने नेमकी काय भूमिका घ्यावी, यावर या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेले सेनेचेच आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. पण उद्धव ठाकरे यांनी जाधवांना भेटण्यास नकार दिला. त्यानंतर मातोश्रीवर पूर्व नियोजित बैठक पार पडली.दरम्यान, मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी मंत्रालया जवळ असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले होते मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्राच्या ‘अरे’ला ममता ‘का रे’ने प्रत्युत्तर दिले !

News Desk

भारत मोदी मुक्तीसाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे | राज ठाकरे

News Desk

अहमदनगरमध्ये महानगरपालिकेच्या मतदान केंद्राबाहेर लाठीचार्ज

News Desk
राजकारण

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटीच्या २२२५ बस

News Desk

मुंबई | यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई प्रदेश क्षेत्रातील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने २२२५ बसेसची सोय केली आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग तर ९ ऑगस्ट पासून संगणकीय आरक्षण सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी (संघटित आरक्षण) संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधू शकतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘ (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.

कोकणातील सावंतवाडी, मालवण,कणकवली,देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग व आजूबाजूच्या परिसरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांनी सुरक्षित प्रवासासाठी आपल्या प्रवासाची तारीख व वेळ ठरवून संबंधित आगारांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Related posts

गडकरीच पंतप्रधान, ज्योतीषांनी वर्तविले भविष्य

News Desk

मी माझ्या संपूर्ण प्रचार मोहिमेत सीपीएमविरोधात एकही शब्द बोलणार नाही !

News Desk

…अन् रणजितसिंहांनी केला घड्याळाचा प्रचार

News Desk