मुंबई | “सरकारमध्ये जे खुर्चांना फेविकॉल लावून बसलेले आहेत.”, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पुन्हा एकाद छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाविरोधात (Chhatrapati Shivaji Maharaj) आम्ही लढत आहोत, असेही संजय राऊतांना आज (8 जानेवारी) माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. तसेच राज्य सरकार, निवडणूक आयोग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमाना आदी मुद्यांवर संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला, असा सवाल संजय राऊतांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “एकेरी उल्लेख केला ना, आम्ही लढतोच आहोत. सरकारमध्ये जे खुर्चांना फेमिकॉल लावून बसलेले आहेत. ते इतर सगळ्या विषयांवर बोलत आहेत. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर बोलत नाहीत. आम्हाला असे वाटले होते की, कोणी तरी मायेचा लाल स्वाभिमानी केंद्रा उभा राहील आणि राजीनामा देईल. आणि महाराष्ट्रात परतेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी त्याग केलेला आहे. पण, सगळे ###ची आवलाद आहेत.”
स्वतंत्र्य आणि स्वयतत्ता आम्हाला दिसली नाही
निवडणूक आयोगाने 12 डिसेंबरला सुनावणी होणार आहे, असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना केल्यावर ते म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या सगळ्या नेमणूका सरकार करते. तरीही आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवतो. निपष्पातीपणे निर्णय घेतले जातील. एक स्वयतत्ता संस्था आहे. आतापर्यंत ही स्वतंत्र्य आणि स्वयतत्ता आम्हाला दिसली नाही. तरीही आम्ही देशाचे प्रमुख स्तंभावर आम्ही विश्वास ठेवतो. सर्वोच्च न्यायालयावर आमचा प्रचंड विश्वास आहे. अजूनही सर्वोच्च न्यायालयात बाळीशात्री बाण्याची न्यायमूर्ती आहे. अजूनही या देशामध्ये संविधान, न्याय आणि कायदा जिवंत आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळे जे काही बेकायदा आणि घटनाह्य या महाराष्ट्रात घडविलेले आहे. केंद्राच्या राजकीय दबावा पोटी, तो डाव उधळला जाईल. आणि या देशातील घटना आणि न्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली. ती जिवंत शाबूत आहेत. याचा साक्षातकारण देशाला होईल, यांची आम्हाला खात्री आहे.”
खरी शिवसेना ही एकच आहे
“खरी शिवसेना ही एकच आहे. आणि एकच राहणार आहे. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. जवळपास 60 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी केली होती. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहे. संपूर्ण शिवसेना ही त्यांच्यासोबत आहे. 20,25, आणि 30 लोक ज्यांना आम्ही निवडणून दिले आहे. ज्यांना आम्ही उमेदवार दिलेले आहे. जे आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक आलेले आहेत. ते गेलेत त्यांचा अर्थ म्हणजे पक्षात फुट पडत नाही. ते हारतील, परंतु, ज्या संस्था आहेत. त्यांच्या नियुक्ती सरकार करते. आम्ही आपेक्षा करतो की, आम्हाला न्याय मिळणार आहे. जी शिवसेना आहे. आम्हाला न्याया मिळणार आहे”, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.