HW News Marathi
राजकारण

“…तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि त्यांचे कार्य आम्हाला सतत आठवते”, राऊतांची केंद्र-राज्य सरकारवर टीका

मुंबई | “या देशामध्ये कायदा आणि घटनेची पायमल्ली होते. सामान्यांवर अत्याचार होतात. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि त्यांचे कार्य आम्हाला सतत आठवत असते”, असे मत व्यक्त करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र आणि राज्य सरकावर निशाणा आहे. महापरिनिर्वान दिनानिमित्ताने (Mahaparinirvana Day) आज (6 डिसेंबर) राऊत आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आदि नेत्यांनी चैत्यभूमीवर जावून डॉ. बाबासाहेब आंडेडकरांनी अभिवादन केले. यानंतर राऊतांनी माध्यमांशी बोलताना केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

 

संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे हे असंख्य शिवसैनिकांसह चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची दोन दैवत आहे. आमच्या मनात आहेत. हा जो महासागर उसळलेला आहे. हा महासागर महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेला आहे. आम्ही त्यातील एक आहोत. आम्हाला फक्त आजच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण होत नाही. जेव्हा जेव्हा या देशामध्ये कायदा आणि घटनेची पायमल्ली होते. सामान्यांवर अत्याचार होतात. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि त्यांचे कार्य आम्हाला सतत आठवत असते. आणि शिवसेना डॉ. बाबासाहेब आंडेकरांचे स्मरण कायम ठेवते. डॉ. बाबासाहेब आंडेकरांची आठवण आम्हाला यासाठी येते, की देशामध्ये आज भारतीय घटनेची प्रत्येक्ष पायमल्ली सुरू आहे. न्याय व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, राजकारण असेल, डॉ. आंबेडकरांच्या घटनेचा अपमान होताना आम्हाला दिसतोय. म्हणून डॉ. आंबेडकर आम्हाला आठवतात.”

 

मुंबईवर मराठी माणसाचा नैसर्गिक हक्क

राऊतांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आणि मुंबई तोडण्याच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, “महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतय, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे यांचा हात धरुन आले होते. आणि प्रबोधनकारांच्या सांगण्यावरून त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. म्हणून आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण होतय. मुंबईत मराठी माणसाला खत्म करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक ऐतिहासिक स्टेटमेंट आहे. अशा प्रकारे मुंबईवर हल्ले सुरू राहिले. तर ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहणार नाही. आणि मुंबईवर मराठी माणसाचा नैसर्गिक हक्क आहे. या त्यांच्या विधानाची आम्हाला आठवण होतेय. या एका नात्याने महाराष्ट्र आणि संपूर्ण देश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या महामानवाला समस्त शिवसैनिकांच्या वतीने अभिवादन करण्यासाठी येथे आलोय.”

Related posts

“नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही शिंदेंना ठाकरेंनी सुरक्षा का नाकारली,” सुहास कांदेंचा सवाल

Aprna

शिवराज सिंग यांचा राजीनामा, काँग्रेसला सत्तेसाठी मायावतीसह अखिलेशची सात

News Desk

नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही, यासाठी प्रशासनाने समन्वयातून पूरपरिस्थिती हाताळावी! –छगन भुजबळ

Aprna