HW News Marathi
राजकारण

“…पिढ्यांनपिढ्या ही गद्दारी त्यांना शांतपणे जगू देणार नाही”, संजय राऊतांची शिंदे गटावर बोचरी टीका

मुंबई | “नातेवाईक, यांची पोरे, यांच्या बायका उद्या लोक म्हणतील. हे गद्दार आहे. यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यानपिढ्यांना ही गद्दारी आता त्यांना शांतपणे जगू देणार नाही”, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर केली आहे. राऊत हे आज (2 डिसेंबर) नाशिकच्या दौऱ्यावर गेले आहेत. नाशिक दौऱ्यादरम्यान राऊतांनी  शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेतून भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

 

राऊत म्हणाले, “मी गद्दार किंवा खोकेवाले आमदार यांच्यासाठी पत्रकार परिषद नाही घेतली. यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसलेला आहे. जसे ‘दिवार’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. राऊत पुढ म्हणाले, “‘दिवार’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या अमिताभ बच्चन यांच्या हातावर गोंदले होते ‘मेरा बाप चोर है’. तस यांचे नातेवाईक, यांची पोरे, यांच्या बायका उद्या लोक म्हणतील. हे गद्दार आहे. यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यानपिढ्यांना ही गद्दारी आता त्यांना शांतपणे जगू देणार नाही.”

 

कर्नाटक सरकाने सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवचले आहे. कर्नाटक सरकारने जत तालुक्या अतिरिक्त पाणी सोडलेले आहे, असा प्रश्न राऊतांना पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्याईला पाहिजे. या महाराष्ट्रावर अशा पद्धतीचे आक्रमन आणि अतिक्रमन गेल्या 50-55 वर्षात झालेले नव्हते. बाजूच्या राजाचा मुख्यमंत्री तुम्हाला डिवचतोय. आव्हान देत तोय,  या महाराष्ट्राला ते जे पाणी सोडले ना चुल्लू भर पानी में डूब जाओ म्हणतो ना आपण जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या. जर तुम्हला स्वाभिमान असेल ना, ज्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली म्हणताय. मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला. कुठे गेला स्वाभिमान, कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुकतोय. या सरकारच्या, काय सांगताय मुख्यमंत्री आम्ही तीन महिन्यापूर्वी क्रांती केली. आता क्रांती करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान सुरू आहे. काय आता क्रांतीची वांती झाली काय?,” असा सवाल करत शिंदे सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.

 

 

 

Related posts

राहुल गांधी म्हणाले तर वाराणसीमधून निवडणूक लढवेन ! 

News Desk

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ की ज्योतिरादित्य नक्की कोण होणार मुख्यमंत्री

News Desk

छोट्या दुकानदारांना दिलासा; पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरण्याची परवानगी

News Desk