HW News Marathi
राजकारण

“सुरज परमार यांच्या डायरीवर एसआयटी स्थापन करा”, संजय राऊतांची सरकारकडे मागणी

मुंबई | “सुरज परमार यांच्या डायरीवर एसआयटी स्थापन करा”, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. “राज्याच्या हिवाळी अधिवेशनात कोणते विषय काढायला लावायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाचा महत्वाचा विषय, मुख्यमंत्र्यांचा 16 भूखंडाच्या संदर्भातील गैरव्यवहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महात्मा फुले यांचा अपमान या विषयांवरच लक्ष दुसरीकडे जावे. विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षाला बोलताना येऊ नये”, असा आरोप राऊतांनी आज (25 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर केला आहे.

 

संजय राऊत म्हणाले, “राज्यपालांनी शिवरायांच्या केलेल्या अपमानावरती लोकांना बोलता येऊ नये. म्हणून हे विषय काढले आहेत. राज्यपालांविरोधात एसआयटी करा. या माणसाने येथे येवून जी काही महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अपमानाची मालिका चालवली आहे. तरी ते बसून आहेत. आणि तुम्ही त्यांचे भजन गात आहे. हा काय प्रकार आहे? एसआयटी यावरच स्थापन व्हायला पाहिजे. एसआयटी सुरज परमार यांच्या डायरीवर स्थापन झाली पाहिजे. अनेक विषय आहेत पण, तसे करत नाही. एसआयटी विरोधी पक्षावर लावत आहेत. इतके सुडबुद्धीने वागणारे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच आले नव्हते.”

 

राज्यपालांविरोधात एसआयटी स्थापन करा

“तुम्ही एसआयटी स्थापन करत आहात. तर राज्यपालांविरोधात एसआयटी स्थापन करा, तुमच्या मंत्र्यांविरोधात एसआयटी स्थापन करा, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात तुम्ही एसआयटी स्थापन करताय का?, असा थेट सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले, “आमचे खासदार अरविंद सावंत यांनी काल एक विषय मांडला. ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमान यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली, त्या डायरीमध्ये जी काही सांकेतिक नावे आहेत. कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. लावा एसआयटी. सगळ्यात आधी राज्यपालांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. भाजप त्यांना पाठिंशी घातलाय, लावा एसआयटी करा, चौकशी.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-भाजपची युती तुटणार ?

News Desk

काँग्रेसच्या निर्मला गावित तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांच्या हाती शिवबंधन

News Desk

अजित पवार घेणार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 

swarit