HW News Marathi
राजकारण

…म्हणून नवज्योतसिंह सिद्धूंनी घेतली राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली | पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनी सोमवारी (१० जून) दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांची भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून नवज्योतसिंह सिद्धू यांच्या मंत्रिपदावरून त्यांच्यात आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यात मोठे वाद झाले. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. नवज्योतसिंह सिद्धू यांनी स्वतः या आपल्या भेटीबद्दलची माहिती ट्विट करून भेटीचा फोटो शेअर करत दिली आहे.

नवज्योत सिंह यांच्याकडे असलेली शहरी विकास मंत्रालयाची जबाबदारी काढून घेत अमरिंदर सिंह यांनी नवज्योतसिंह यांच्याकडे ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, नवज्योतसिंह सिद्धू यांनी हा पदभार अद्याप स्वीकारलेला नाही. त्यामुळेच नवज्योसिंह सिद्धू आणि अमरिंदर सिंह यांच्यातील वाद आणखीनच चिघळला. त्यामुळे नव्योत्तसिंह सिद्धू हे आपले मंत्रिपद देखील सोडू शकतात अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोवा भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Gauri Tilekar

तब्बल 9 महिन्यानंतर राज्याच्या सत्तांतरवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली; निकालाची प्रतिक्षा

Aprna

संभाजी भिडे यांचे मुंबईतील व्याख्यान रद्द करण्याची भीम आर्मीची मागणी

News Desk