नवी दिल्ली | ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (२७ डिसेंबर) रिलीज करण्यात आला. दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांनी या सिनेमाबाबत कोणत्याही प्रकारचे भाष्य करणे टाळले आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांकडून मनमोहन सिंग यांना या सिनेमाबाबत प्रश्न विचारण्यात आले. मात्र, प्रश्नांना उत्तर देणे टाळले आहे. दरम्यान, काँग्रेस या चित्रपटाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
#WATCH Former Prime Minister Dr.Manmohan Singh evades question on the film #TheAccidentalPrimeMinister pic.twitter.com/IkYeNibGSj
— ANI (@ANI) December 28, 2018
‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाबाबत काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून या सिनेमावरून आता राजकारण चांगलेच पेटले आहे. या सिनेमावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे.”ज्या पंतप्रधानांनी अत्यंत अवघड परिस्थितीतून देशाला वाचविले त्या मनमोहन सिंग यांना ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ असं संबोधले जात आहे. परंतु, आताच्या पंतप्रधानांनी तर देशाचाच अॅक्सिडंट केला आहे”, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे. सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन भाजपकडून हा राजकीय डाव खेळला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार पीएल पुनिया यांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.