नवी दिल्ली | “पर्रिकरजींच्या परिस्थितीबाबत मला प्रचंड सहानभूती आहे. आमच्या गोव्यातील भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर आणलेल्या प्रचंड दबावामुळे त्यांनी माझ्यावर टीका केली. या टीकेतून पर्रीकरांची निष्ठा दिसली”, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या पत्राला उत्तर देताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. मनोहर पर्रीकर यांनी आपल्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांना बुधवारी (३० जानेवारी) खडसावले.
I totally empathise with Parrikar Ji's situation & wish him well. He's under immense pressure from the PM after our meeting in Goa and needs to demonstrate his loyalty by attacking me.
Attached is the letter I've written him. pic.twitter.com/BQ6V6Zid8m
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 30, 2019
“राहुल गांधी राजकीय भेटीचा राजकीय फायदा घेत आहेत” अशी टीका मनोहर पर्रीकर यांनी केली होती. “माझ्या कार्यालयात आपल्या भेटीचा मीडिया अहवाल वाचल्यानंतर मला त्रास झाला. आपण हा दौरा अल्प राजकीय फायद्यासाठी वापरला आहे असे मला वाटते”, असे म्हणत मनोहर पर्रीकर यांनी एका पत्राद्वारे राहुल गांधींना सुनावले. त्यावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.