HW News Marathi
राजकारण

“मुख्यमंत्र्यांकडून प्रकल्पासंदर्भात उत्तर येणे अपेक्षित होते…”, आदित्य ठाकरेंचा टोला

मुंबई | “जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होते, ते उपमुख्यांनी दिले आहे”, असा टोला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून सर्व प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर करणे हा मविआचा फेक नरेटिव्ह आहे, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी केला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपाचे खंडण केले.

आदित्य ठाकरे म्हणाले, “खर तर उत्तर मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर अपेक्षित होते. २००० कोटीचा इलेक्ट्रिक हबची घोषणा. आपण घेऊ शकत होतो ते उद्योग घालवले. वेदांतापेक्षा मोठा उद्योग मिळेल असे आश्वासन. दीड लाख कोटी आणि २ हजार कोटी यात अंतर. अशा घोषणा कधी झाल्याचे ऐकिवात नाही. ते आकड्यांच्या खेळात तरबेज.”

त्यात एक रायगड प्रकल्पाचा उल्लेख हा ट्वीट २५ मे २०२२ चा आहे. तेव्हा मविआ होती. तो आम्ही दावोसला असतांना एमोयु सही झाले. याचे श्रेय आज ते घेत आहोत. आजची प्रेस तद्दन खोटी. त्यांना चुकीची माहिती. फाॅक्सकाॅन बाबत जानेवारी २०२२ ची. तो प्रकल्प वेगळा तो तामिळनाडूला गेला. वेदांता फाॅक्सकाॅन मोबाईलसाठी होता सेमी कंडक्टरचा नव्हता. त्यामुळे दिशाभूल करु नये.

Related posts

युती झाली तर आम्ही किरीट सोमय्यांसाठी प्रचार करणार नाही !

News Desk

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

News Desk

दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी

Aprna