HW News Marathi
राजकारण

राजीव गांधींनी जे केले नाही ते भाजपने करुन दाखविले

नवी दिल्ली | भाजप सरकारने आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरून (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदीनी) सुरू करण्यात आले आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या यादीत जवळपास ४० लाख नागरिकांची नावे नाहीत. या घटननंतर तीव्र पडसाद संसदेत उमटलेले आज पहायला मिळाले.

काँग्रेसने आसाम करार लागू केले, परंतु राजीव गांधींनी हा करार अंमलात आणण्याची हिंमत मात्र केली नाही. परंतु भाजप सरकारने हे करून दाखविले. असे अमित शहा यांनी राज्यसभेतील भाषणा दरम्यान असे विधान केले. शहांच्या या विधानानंतर गोंधळ केला. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचे मूळ काय, हे रजिस्टर कुठून आले, हे कोणीही सांगत नाही, असे अमित शहा राज्यसभेत म्हणाले.

१४ ऑगस्ट १९८५ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आसाम करार लागू केला. हा करार आसाममध्ये अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना सिटिजन रजिस्टरमधून वगळून एक नॅशनल रजिस्टर तयार केले होते. अशी नोंद या करारा होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सत्तेत आल्यानंतर एका वर्षात देशातील २२ लाख युवकांना सरकारी नोकऱ्या देणार | काँग्रेस

News Desk

दिवाळीनिमित्त मुंबईत किल्ले बांधणीला उस्फुर्त प्रतिसाद

swarit

नवाब मलिक यांची बैल गाडीवरुन आक्रोश रॅली

swarit
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

swarit

बीड | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवर संपूर्ण महाराष्ट्र पेटताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील अभिजित देशमुख (वय ३५ वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. देशमुख यांनी मंगळवारी सकाळी घराजवळील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

अभिजित यांच्या खिशात चिट्ठी सापडली असून यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधांचा खर्च या कारणांमुळे त्यांनी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तसेच अभिजित यांनी स्वत: लिहिले आहे का? याचा तपास पोलीस करत आहे.अभिजित देशमुखने विज्ञान विषयातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले होते. परंतु अभिजितला नोकरी नसल्याने तो अस्वस्थ होता. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही. तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर बँकेचे कर्ज देखील होते. त्यामुळे व्यवसाय देखील करू शकत नाही. अभिजितने मित्रांकडे अशी खंत व्यक्त केली होती.

मराठा आरक्षणासाठी याआधी औरंगाबादमध्ये गोदावरी नदी पात्रात उडी मारुन काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केली होती. तर, औरंगाबादमध्ये गंगापूर तालुक्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनावणे यांनी विष प्राशन केले असून उपचारादरम्यान त्यांचा २५ जुलैला मृत्यू झाला. २९ जुलै रोजी नांदेड मधील कचरु दिगंबर कल्याणे या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. तर ३० जुलै रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमधील अणखी एका तरुण प्रमोद होरे पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या केली.

Related posts

ज्येष्ठांना ‘आधार’सक्ती

News Desk

धनंजय मुंडे यांच्या मागणीची सरकारकडून दखल

News Desk

जाणून घ्या…कोण आहेत सचिन अहिर

News Desk