मुंबई | देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपार पराक्रम गाजवत आहेत. आज संपूर्ण देश एकजुटीने आपल्या जवानांसोबत उभे आहेत. संपूर्ण जग आमची एकजूट बघत आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भाजपच्या ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ कार्यक्रमादरम्यान बोलताना मोदी म्हणाले आहेत. मोदी यांनी एक कोटींहून अधिक भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ही जगभरातील आजपर्यंतची सर्वात मोठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असल्याचा दावा भाजपने केला आहे.
PM Narendra Modi: Hamare sena ke samarthya par hame bharosa hai. Isliye bahut avashyak hai ki kuch bhi aisa na ho jisse unke manobal par aanch aaye ya hamare dushmano ko hamare par ungli uthane ka mauka mil jaaye pic.twitter.com/UOww7Ah9UX
— ANI (@ANI) February 28, 2019
आम्हाला आमच्या सैन्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. यासाठी आपण यांची खबरदारी घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थीत त्यांचे मनोबल खचू देऊ नये. जेणे करून शत्रुंना आपल्या विरोधात बोलण्याची संधी मिळू नये, अशा शब्दात मोदींनी नाव न घेता पाकिस्तानवर टीका केली आहे.
PM Narendra Modi: We have to be hardworking in all sectors. India is grateful to all those who are protecting the nation. It is because they are there, the nation can reach new levels of development pic.twitter.com/qmdvAJkVyK
— ANI (@ANI) February 28, 2019
आपल्या देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. दहशतवादी हल्ले करून देशाची प्रगती थांबविण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपण सर्व देशवासीयांनी एकजुटीने उभे राहण्याची शक्यता आहे.” असे आवाहन मोदींनी यावेळी देशातील जमनतेला केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.