HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

कोल्हापुरच्या अंबाबाईच्या दर्शनाने युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, जागावाटपचा तिढा कायम

मुंबई |  युतीचा तिढा सुटल्यानंतर आता प्रचाराच्या कार्यक्रम ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल (१२ मार्च) रात्री उशिरा मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. कोल्हापुरच्या अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फुटणार असल्याची माहिती मिळाली आहे. युतीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ अमरावतीत फुटणार आहे.

भाजप-सेने यांच्या युतीचा पहिला मेळावा १५ मार्च रोजी दुपारी अमरावतीला होणार असून युतीचा दुसरा पदाधिकारी मेळावा १५ रोजी रात्री नागपूरला होणार आहे. एकाच दिवशी दोन मेळावे होणार आहेत. युतीचा तिसरा मेळावा येत्या रविवार (१७ मार्च) रोजी दुपारी  औरंगाबादला होणार असून याच दिवशी युतीचा चौथा मेळावा १७ मार्च रोजी रात्री नाशिकला होणार आहे. युतीचा पाचवा मेळावा सोमवार (१८ मार्च) रोजी दुपारी नवी मुंबईत होणार असून याच दिवशी युतीचा सहावा मेळावा १८ मार्च रोजी रात्री पुण्यात होणार असल्याचे या बैठकीत ठरले.

रविवारी २४ मार्चला कोल्हापुरात होणार शिवसेना-भाजप युतीची एकत्रित सभा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई, पुण्यातील प्रचार मेळाव्यावरही एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील हे नेते मंडळी देखील उपस्थित होते.

युतीच्या जागावाटपाचा तिढा कायम

युती झाल्यानंतर शिवसेना २३ तर भाजप २५ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले आहे. परंतु अद्याप जागावाटप किंवा वाटाघाटींवर काल झालेल्या बैठकीत कुठे कोणता उमेदवार द्यायचा यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांची ईशान्य मुंबई, रावसाहेब दानवे यांची जालना आणि पालघर या जागांबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 

 

Related posts

मराठा आरक्षणावर आज होणार अंतिम निर्णय

News Desk

राज ठाकरेंच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविणार ?

News Desk

पंकजा मुंडेंना सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे |उद्धव ठाकरे

News Desk