HW News Marathi
राजकारण

INX Media Case : सीबीआय पी. चिदंबरम यांच्या शोधात, अटक टाळण्यासाठी पळापळ

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया घोटाळ्या प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (२० ऑगस्ट) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यानंतर सीबीआयने हालचाल सुरु केली आणि सीबीआयची एक टीम काल संध्याकाळी ६.३० वाजता चिदंबरम यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर काही वेळाने ७.३० वाजता ईडीची टीमही त्यांच्या घरी पोहोचली होती. तपास यंत्रणांनी चिदंबरम यांच्या घरावर रात्री नोटीस चिकटवली आहे.

सीबीआयची टीम आज (२१ ऑगस्ट) तिसऱ्यांदा त्यांच्या घरी धडकली. परंतु आजही चिदंबरम सापडले नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्याने चिदंबरम यांना कधीही अटक होऊ शकते. चिदंबरम यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. चिदंबरम यांना तीन दिवस तरी अटक न करण्याचा आदेश द्यावा, ही मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने अमान्य केली होती.

नमके काय आहे प्रकरण

चिदंबरम हे अर्थमंत्री असतानाच्या काळात आयएनएक्स मीडियामध्ये विदेशातून ३०५ कोटी रुपयांचा निधी गुंतवण्यात आला होता. याबाबतच्या प्रस्तावाला चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील एफआयपीबीने मंजुरी दिली होती. चिदंबरम यांच्या पुत्राच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ताब्यात असलेल्या कंपन्यांद्वारे विदेशातून हा निधी भारतात आणण्यात आला असल्याचा दावा तपास सीबीआयनी केला आहे. आयएनएक्स मीडीया घोटाळ्याप्रकरणी दिल्‍ली उच्च न्यायालयाने २५ जुलै २०१८ रोजी चिदंबरम यांना अंतरीम जामीन दिला होता. त्यानंतर वारंवार त्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. मात्र, यावेळी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्टार प्रचारकांच्या यादीतून मुलायम सिंह यांना डच्चू, अखिलेश आजमगडमधून निवडणूक लढविणार

News Desk

Bhima Koregaon Case : वरवर राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

News Desk

पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक, ‘या’ नेत्यांचा उपस्थित राहण्यास नकार

News Desk