HW News Marathi
राजकारण

केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकीची करणार घोषणा

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission of India) आज गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujarat Assembly Election) तारीख जाहीर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (3 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यात गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत. गुजरातमध्ये गेल्या 25 वर्षापासून भाजपची सत्ता आहे. गुजरात काबीज करण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे. यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आप पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. यामुळे भाजप, काँग्रेस आणि आप यांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणूक ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात असून गुजरात विधानसभा निवडणूक ही डिसेंबर महिन्यात 2 डिसेंबरला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होऊ शकते. तर 5 किंवा 6 तारखेला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होऊ शकते.

दरम्यान, यापूर्वी निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला  मतदान होणार आहे. आपने दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर गुजरातच्या दिशेने आगेकूच केली आहे. यापूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपने मंगळवारी (1 नोव्हेंबर) 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आपने आतापर्यंत 108 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तसेच आपने पंजाबप्रमाणे गुजरातमध्ये देखील मुख्यमंत्री निवडण्यासाठी एसएमएसची मोहिम सुरू केली आहे.

 

Related posts

आमच्या उमेदवारांचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच !

News Desk

शरद पवारजी हे बदललेल्या वाऱ्याची दिशा आधीच ओळखतात !

News Desk

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर लोकसभेच्या निकालानंतर होणार कारवाई

News Desk