HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा भरकटले

सांगली । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर पुन्हा भरकटल्याची घटना घडली आहे. दिशा न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोल्हापूर शहराभोवती चकरा मारत होते. फडणवीस सांगलीचा दौरा आटोपून कोडोलीतील शेतकरी कष्टकरी मेळाव्याला जात असतानाच हा प्रकार घडला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार होते.

पृथ्वीराज देशमुख यांनी परिसराचा अंदाज घेत पायलटला दिशा सांगितली.त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर वारणा हेलिपॅडवर उतरले. हेलिकॉप्टरचे उड्डाण झाल्यानंतर काही वेळात सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर फेऱ्या मारत होते. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार घडण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. या आधी लातूर, अलिबाग, नाशिक, भाईंदरमध्ये असे प्रकार घडले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मग दोन पक्षांतर करणाऱ्यांचे जुळाले असेल”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Aprna

काँग्रेसचा पराभव झाला म्हणजे संपूर्ण देश हरला हा कोणता तर्क आहे ?

News Desk

कुणी हिंदू मुलीला स्पर्श केला तर त्याचे हात तोडून टाका !

News Desk