HW News Marathi
राजकारण

“भारत जोडो यात्रेत ‘मविआ’च्या काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशांचा वापर”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

मुंबई | “काँग्रेसने मागील अडीच वर्षातील सत्तेच्या काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैसा वापरण्यात येत आहे,” असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) केले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी (7 नोव्हेंबर) रात्री महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला आहे. भारत जोडो यात्रा ही आज (8 नोव्हेंबर) देगलूरमधून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खर्च होणारा पैसा हा कुठून आला. यात कोणी खर्च केला यांची चौकशी उपमुख्यमंत्री आणि गृह खाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी करावी. आणि या यात्रेसाठी काँग्रेसच्या केंद्रीय काँग्रेसच्या खात्यातून पैसे खर्च होता आहेत का? की महाराष्ट्र काँग्रेसच्या खात्यातून पैसे खर्च होत आहेत का? मागील अडीच वर्षात महाविकासआघाडीच्या काळात केलेल्या भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैसे खर्च होत आहेत का?, तर सरकारमधून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सरकार हाच काँग्रेसचा जुना अजेंडा आहे, अशी मागणी करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

 

 

 

Related posts

चव्हाण ७०,००० कोटी खर्च केले…पाणी कुठे गायब झाले ?

News Desk

डिजिटल व्यवहारासंबंधी फसवणूकीवर बंदी घालण्यासाठी आरबीआयचे नवे नियम लागू

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या रद्द

Gauri Tilekar