मुंबई | राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता संघर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत पूर्णविराम घेतला आहे. शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या शिंदेसह 16 आमदारांना अपात्र करण्याच्या कारवाईच्या याचिकेवर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. परंतु, या याचिकेवर आजच (1 जुलै) सुनावणी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयता करण्याची मागणी केले हीतो. परंतु, या प्रकरणी न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यामुळे शिवसेनेच्या हाती मोठी निराशा लागली आहे.
दरम्यान, शिंदे सरकार 3 आणि 4 जुलै रोजी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येण्याची शक्तता वर्तवली जाते. या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात शिंदे सरकार बहुमत चाचणी सिद्ध करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने बहुमत चाचणी सिद्ध पुढे ढकलण्यासाठी त्यांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रेच्या याचिकेवर आज सुनावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु, न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
शिवसेनेने 16 बंडखोर आमदारांना अपात्र करणारी नोटीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पाठविली आहे. या नोटीसविरोधात शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने सुनावणी केल्यानंतर 11 जुलै रोजी सुनावणी होणार असून ज्या आमदारांना अपात्रेची नोटीस पाठविली, ते 12 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते.
Sr adv Kapil Sibal mentions the matter seeking urgent hearing of plea of Uddhav Thackeray camp MLA Sunil Prabhu seeking suspension of dissident Shiv Sena MLAs from the House &restraining them from entering Assembly or taking part in proceedings till their disqualification decided
— ANI (@ANI) July 1, 2022
संबंधित बातम्या
शिंदे गटाला मोठा दिलासा! अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार तुर्तास टळली
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.