HW News Marathi
राजकारण

विधान परिषदेसाठी दराडेंना निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

नाशिक | विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी नाशिकमध्ये शिवसेनेला अखेर दिलासा मिळाला आहे. शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा अर्ज तब्बल १२ तासांच्या छाननीनंतर वैध ठरविण्यात आला आहे. दराडेंच्या या अर्जासंदर्भात राष्ट्रवादी कडून आक्षेप नोंदविण्यात आला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी आमदार नरेंद्र दराडे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती.

येवला नगरपालिकेची दीड लाख रुपयांची थकबाकी तसेच अर्ज अपूर्ण भरल्यामुळे आक्षेप नोंदविण्यात आला होता. राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आयोगाकडून मार्गदर्शन मागवून सर्वोच्च न्यायालयाच्या केसेसचा अभ्यास करुन अखेर रात्री साडेअकरा वाजता दराडे यांच्या बाजूने निर्णय दिला.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय दिल्यामुळे दराडेंना निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व प्रकारामुळे दराडे यांना शिवसनेने दिलेली उमेदवारी तसेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराने घेतलेला आक्षेप यामुळे विधान परिषदेच्या या जागेकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोक त्याविरोधात आवाज उठवतात! – शरद पवार

Aprna

“काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम”, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना टोला

Aprna

शिवसेना प्रवेशासंदर्भात पवारांनी घेतली भुजबळांची भेट

News Desk