HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्राची कन्या न्यूयॉर्कची न्यायाधीश

न्यूयॉर्क | मराठमोळ्या दिपा आंबेकर यांची न्यूयॉर्कमध्ये न्यायाधीश पदी निवड करण्यात आली आहे. दिपा आंबेकर न्यूयॉर्क सिटीच्या दिवाणी न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्त झाल्या आहेत. न्यूयॉर्क मध्ये न्यायाधीश झालेल्या दिपा या दुस-या भारतीय महिला आहेत. यापूर्वी चेन्नईच्या राजा राजेश्वरी न्यूयॉर्कमध्ये न्यायाधीश झाल्या आहेत. त्यानंतर दिपा या न्यूयॉर्क येथे न्यायाधीश होणा-या दुस-या भारतीय महिला ठरल्या आहेत.

न्यूयॉर्क सिटी परिषदेवर ३ वर्षे वरिष्ठ पदावर काम करण्याचा दीपा आंबेकर यांना अनुभव आहे. त्याच बरोबर दिपा यांनी नागरी सुरक्षा समितीवर सल्लागार म्हणूनही काम केले आहे. न्यूयॉर्क सिटीचे महापौर बिल दा ब्लासियो यांच्या कार्यालयाने दिपा आंबेकर यांच्या नियुक्ती संदर्भात प्रस्ताव जारी केला आहे. दीपा आंबेकर यांची दिवाणी न्यायालयात नियुक्ती करण्यात आली असून त्या क्रिमीनल कोर्टात सेवा बजावणार असल्याचेही यात सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुक लाइव्हवर दाखवला सामूहिक बलात्कार

News Desk

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा होतोय याचा मनःपूर्वक आनंद !

News Desk

2007 Hyderabad Twin Blasts Case | एनआयए स्पेशल कोर्टाने आरोपींना ठरवले दोषी

News Desk