HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आज युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

कोल्हापूर | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज (२४ मार्च) कोल्हापुराती तपोवन मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. या मैदानात जवळपास २ लाख नागरिक बसतील अशी सोय करण्यात आली आहे.

सभेच्या पार्श्वभूमीवर काल (२३ मार्च) आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सभेच्या मैदानाची पाहणी केली आहे. युतीची ही पहिल सभा असून या सभेत शिवसेना-भाजप युतीचे दिग्गज नेत्यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सभेत उपस्थित राहणार आहेत. या प्रचार सभेसाठी उद्धव ठाकरे मुंबईतून  दुपारी २ वाजता कोल्हापूरसाठी रवाना होणार आहे. कोल्हापूरच्या ठाकरे अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेऊन सभेसाठी जाणार आहे.

युतीच्या सभेसाठी गर्दीच्या कारणाने जर कार्यकर्त्यांना सभेपर्यंत पोहचता आले नाही तर त्यांच्यासाठी शहरातील प्रमुख चौकात १० स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. ही सभा ‘न भूतो न भविष्यति’ सभा करुन कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा २८ तारखेला वर्ध्यात होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

Related posts

जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणारच – नारायण राणे

News Desk

गडकरी, आंबेडकर, चव्हाणांसह दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

News Desk

पंतप्रधान मोदी चाचा नेहरुंची जागा घेवू शकत नाहीत

धनंजय दळवी